नाशिक-संभाजीनगर महामार्गावर पिंपळसजवळ झालेल्या भीषण अपघातात चांदोरी येथील आयटीआयचा विद्यार्थी पीयूष प्रताप गायकवाड (वय १७) याचा मृत्यू झाला होता. या घटनेचा तीव्र धक्का बसल्याने त्याची आजी बब्याबाई माधवराव गायकवाड (७०) यांचेही निधन झाल्याने चांदोरी गावावर शोककळा पसरली आहे. बब्याबाई या प्रसिद्ध तमाशा कलावंत व वगसम्राट स्व. माधवराव गायकवाड यांच्या धर्मपत्नी होत.
पीयूष हा शुक्रवारी (दि. २४) दुपारी सुमारे अडीच वाजता मित्र करण भोरसोबत दुचाकीने निफाड येथील आयटीआयला जात होता. त्यावेळी समोरून येणाऱ्या कारची त्यांच्या दुचाकीला जोराची धडक बसली होती.





