लाख रुपयांचेभंगार खाक

Contributed byयेवला|महाराष्ट्र टाइम्स

शहरालगत नागडे रेल्वेगेटजवळ भंगाराला आग लागली. तौफिक बेग यांच्या व्यवसायातील लाखो रुपयांचे भंगार जळून खाक झाले. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

millions of rupees worth of scrap burned down major accident near nagde railway gate

शहरालगत नागडे रेल्वेगेटजवळ मोकळ्या जागेतील भंगाराला अकस्मात आग लागून सुमारे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तौफिक बेग हे भंगार खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी मोकळ्या जागेमध्ये ठेवलेले भंगार आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. रविवारी, (दि. २६) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सदर घटना घडली.

आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशामन बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशन दलाने आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत मोठ्या प्रमाणात भंगार जळून खाक झाले होते.