एका १९ वर्षीय युवतीला शेगाव येथे नेऊन लॉजवर बलात्कार केल्याची घटना २ फेब्रुवारीला घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध अ ॅट्रॉसिटीसह विविध कलमांनुसार गुन्हे दाखल केले आहे.
आकाश सोनाजी भामद्रे, असे आरोपीचे नाव असून, तो संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील रहिवासी आहे. आरोपीने पीडित युवतीस शेगाव येथे नेले. ‘तुझ्यासोबत बोलायचे आहे’ म्हणत दुपारी तीनच्या सुमारास मंदिर परिसरातील एका लॉजवर नेले. त्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. या घटनेबद्दल कुणाला सांगितल्यास जीवाने मारून टाकेन, अशा धमक्या दिल्या. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी पीडितेने आपल्या गावालगतच्या तामगाव पोलिसांत धाव घेतली. तेथून हा गुन्हा शेगाव शहर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
या प्रकरणी पोलिसांनी आकाश भामद्रे याच्याविरुद्ध कलम ६४, ७४, ३५१ (२), सहकलम ३ (१), (डब्ल्यू) (१), ३ (१) (डब्ल्यू), ३, (२) (व्ही) तसेच अनुसूचित जाती-जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले.
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर अंकुश आणण्यासाठी सरकारने कायदे केले. तरीही त्याचा परिणाम फारसा होत असल्याचे दिसून येत आहे. अजूनही महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबलेल्या नाहीत, असा आरोप होत आहे.









