जागतिक कर्करोगदिनानिमित्त एचसीजी कॅन्सर सेंटरतर्फे मेडिकल चौकातील व्हीआर मॉल येथे ‘कलर्स ऑफ होप’च्या माध्यमातून कर्करोगाविषयी जनजागृती करण्यात आली.
कलर्स ऑफ अंतर्गत कॅनव्हास पेंटिंग स्पर्धेतील निवडक चित्रांचे प्रदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीता राजवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. त्या म्हणाल्या, ‘कर्करोगाविषयीची जनजागृती करण्याकरिता रुग्णालयाबाहेर जाणे आवश्यक आहे. याच भावनेतून कलर्स ऑफ होपद्वारे कर्करोगाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. कर्करोगाशी लढताना लवकर निदान, वेळेवर उपचार आणि सामूहिक पाठिंब्याचा संदेश देण्याचा हा प्रयत्न आहे. जागरूकता आणि एकजुटीच्या बळावर कर्करोगाशी यशस्वीरित्या लढा देणे शक्य आहे.’
कलादालनसोबतच कर्करोग प्रतिबंध आणि लवकर निदान याविषयी जनजागृती करण्यासाठी नुक्कड नाटकांचे सादरीकरण झाले. याशिवाय, डॉ. वैभव सोनवणे, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. मंगेश पाटील, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. शंतनू पेंडसे आणि हेमॅटोलॉजिस्ट डॉ. रजत बजाज यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत कर्करोगाची लक्षणे, तपासणी आणि उपचारांविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात कर्करोगातून यशस्वीरित्या बऱ्या झालेल्या रुग्णांचे अनुभवकथन झाले. या अनुभवकथनामुळे कर्करोगाबाबतचे गैरसमज दूर करण्यात मदत झाली.






