चुकीच्या इंजेक्शनने लहानगीचा मृत्यू?

महाराष्ट्र टाइम्स

सायन रुग्णालयात दाखल झालेल्या तीन महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी चुकीच्या इंजेक्शनमुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. मुलीला ताप असल्याने रुग्णालयात आणले होते. इंजेक्शन दिल्यानंतर तिची प्रकृती बिघडली. पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

did a wrong injection cause the babys heart to stop
सायन रुग्णालयात तीन महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी चुकीचे इंजेक्शन दिल्याने तिचा जीव गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रवी कोल्हे यांच्या तीन महिन्यांच्या मुलीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ३ फेब्रुवारी रोजी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉक्टरांनी तिला एक इंजेक्शन दिले. या इंजेक्शननंतर तिची प्रकृती अचानक बिघडली आणि तिचा मृत्यू झाला.
पालकांनी या घटनेनंतर गोवंडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.