गोऱ्हेंनी घेतली उच्चायुक्तांची भेट

महाराष्ट्र टाइम्स

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांची भेट घेतली. महाराष्ट्र विधानमंडळाचे कामकाज आणि कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनच्या परिषदेतील मुद्द्यांवर चर्चा झाली. यूके अभ्यास दौऱ्याची तयारी करण्यात आली. लंडनमधील महाराष्ट्र मंडळाला मदतीसाठी सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही संवाद साधण्यात आला. पुढील कार्यक्रमांवर चर्चा झाली.

neelam gorhe and uk high commissioner vikram doraiswamys important discussion

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्र विधानमंडळाचे कामकाज, तसेच कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनच्या (सीपीए) बार्बाडोस येथे झालेल्या परिषदेमधील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पीठासीन अधिकाऱ्यांचा १५ ते २१ फेब्रुवारी या कालावधीसाठी यूके अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. उच्चायुक्तांच्या भेटीविषयी गोऱ्हे यांनी सांगितले की, ‘लंडनमधील महाराष्ट्र मंडळ यांना महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मदतीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी विशेष सहकार्य करण्याची विनंती मंडळाचे वैभव खांडगे आणि वृषाल खांडके यांनी उच्चायुक्तांकडे केली. या भेटीत भारतीय दूतावासात सुरक्षा जबाबदारी सांभाळणारे वरिष्ठ अधिकारी किरण भोसले (मुंबई पोलिस) यांच्याशीही संवाद झाला. मध्यंतरी उद्भवलेल्या प्रश्नांमध्ये तिरंगा ध्वजाचे प्रभावी संरक्षण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या काळातही त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले’. दरम्यान, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचेही आगमन झाले असून, पुढील कार्यक्रम आणि इतर प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. ब्रिटनमधील काही विषयांवर पुढील पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही गोऱ्हे यांनी सांगितले.