कॅन्सर रुग्णांच्या वाढत्या रुग्णसंख्येचे होणारे निदान लक्षात घेता जे. जे. रुग्णालयाच्या संकुलातील प्रादेशिक युनानी औषध संशोधन संस्थेच्या नूतनीकरण केलेल्या सहउपचार केंद्राचे उद्घाटन आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
‘रुग्णालयातील युनानी संशोधन केंद्राचे अद्ययावतीकरण म्हणजे पारंपरिक औषधोपचार व्यवस्थांना आधुनिक, रुग्णकेंद्रित आरोग्यसेवा आराखड्याचा प्रमुख भाग बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृढ वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे,’ असे मंत्री प्रतापराव जाधव यांनी नमूद केले. ‘या नूतनीकरण केलेल्या सहउपचार केंद्रामुळे युनानी आणि पारंपरिक औषधोपचार एकाच छताखाली आले आहेत. त्यातून रुग्णांना विज्ञानाधिष्ठित संशोधन आणि तथ्यांचा आधार असलेल्या सुरक्षित, परिणामकारक आणि सर्वांगीण उपचारसुविधा सेवा उपलब्ध होतील,’ असेही मंत्री जाधव म्हणाले.









