‘कृषी क्षेत्रासाठी‘एआय’चा वापर’

महाराष्ट्र टाइम्स

महाराष्ट्राने कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आयोजित करून देशात पहिला मान मिळवला आहे. 'एआय फॉर ॲग्री २०२६' परिषदेचे उद्घाटन झाले. या परिषदेत कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण अ‍ॅप्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सचे लोकार्पण करण्यात आले. महा एजी एक्स हा महत्त्वाकांक्षी डेटा प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. हे धोरण २०२५-२०२९ पर्यंत लागू राहील.

‘कृषी क्षेत्रासाठी‘एआय’चा वापर’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

कृषीसाठी एआय परिषद घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ‘एआय फॉर ॲग्री २०२६’चे उद्घाटन; एआय आधारित अ ॅप्सचे लोकार्पणमुंबई : कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आयोजित करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीचा सर्वसमावेशक विकास करण्यावर भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ अंतर्गत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलना’चे उद्घाटन झाले. कार्यक्रमाला केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंह, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल पायाभूत सुविधा आणि एआयला प्राधान्य देण्यात आले आहे. ‘इंडिया एआय मिशन’च्या धर्तीवर राज्याने सर्वसमावेशक कृषी एआय धोरण जाहीर केले असून असे धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे.’

राज्यातील शेती क्षेत्र हे अधिक आधुनिक, तंत्रज्ञानस्नेही आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त करण्याच्या दृष्टीने कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित महत्त्वपूर्ण अ ॅप्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यामध्ये महा एजी एक्स (महा-अ ॅग्री डेटा एक्स्चेंज) हा राज्याचा महत्त्वाकांक्षी डेटा प्लॅटफॉर्म असून, कृषी क्षेत्रातील माहिती सुरक्षित पद्धतीने एकत्रित करून संशोधन, नवोन्मेष आणि धोरणात्मक निर्णयांसाठी वापरण्याचा मार्ग मोकळा करणार आहे. हा प्लॅटफॉर्म नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून विकसित करण्यात आला आहे.