बीजांडविक्रीचे धागेदोरे तेलंगण, बेंगळुरूपर्यंत

महाराष्ट्र टाइम्स

गरजू महिलांना आर्थिक आमिष दाखवून गर्भाशयातील बीजांडांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीचे धागेदोरे तेलंगण आणि बंगळुरूपर्यंत पोहोचले आहेत. बदलापूर येथे कारवाई करत पोलिसांनी या टोळीला उघडकीस आणले. अटक केलेल्या महिलांच्या संपर्कातून अनेक मोठी रुग्णालये आणि डॉक्टर तपास यंत्रणांच्या रडारवर येण्याची शक्यता आहे. या टोळीने शेकडो महिलांना फसवले.

oocyte sales culprits boldly reach from telangana to bengaluru

गरजू महिलांना हेरून, त्यांना आर्थिक आमिष दाखवून त्यांच्या गर्भाशयातील बीजांडांची विक्री करण्यासंबंधीच्या टोळीचे धागेदोरे नाशिक, नागपूरसह तेलंगण व बेंगळुरूपर्यंत पोहोचल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन महिलांच्या मोबाइल फोनमधील संपर्कातून या टोळीमध्ये सहभागी असलेली अनेक मोठी रुग्णालये आणि काही डॉक्टर तपास यंत्रणांच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.

बदलापूर येथील जोवेली भागात परिमंडळ चारच्या पोलिसांनी छापा टाकत केलेल्या कारवाईत गर्भाशयातील बीजांडांची विक्री करणारी टोळी उघडकीस आल्याने बदलापूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या टोळीने तीनशेहून अधिक गरजू महिलांना आर्थिक आमिष दाखवून (पान ४वर)