मुख्याध्यापक निलंबित

महाराष्ट्र टाइम्स

पुण्यात बीड जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर दहावीची परीक्षा मंडपात घेण्यात आली. जागा अपुरी पडल्याने हा प्रकार घडला. या गंभीर घटनेची दखल घेत केंद्र संचालक आणि मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे. यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. एम. राऊत यांच्यावर कारवाई झाली आहे. या घटनेमुळे परीक्षार्थींच्या सोयीसुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

principal suspended in beed district creating tension among students
पुणे : बीड जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेदरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेवराई तालुक्यातील कुर्ला येथील यशवंत विद्यालयात परीक्षार्थींना बसण्यासाठी जागा अपुरी पडल्याने चक्क मंडपात परीक्षा घेण्यात आली. या गंभीर प्रकारानंतर केंद्र संचालक आणि मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे.

यशवंत विद्यालय परीक्षा केंद्रावर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होती. मात्र, परीक्षा हॉलमध्ये जागा कमी पडल्याने विद्यार्थ्यांना मंडपात बसवून परीक्षा देण्यास भाग पाडण्यात आले. हा प्रकार समोर येताच सर्वत्र संतापाची लाट उसळली. या घटनेची गंभीर दखल घेत विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. एम. राऊत यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आदर्श शिक्षण संस्थेच्या यशवंत विद्यालयात यशवंत विद्यालयासह इतर तीन शाळांचे विद्यार्थी दहावीची परीक्षा देत होते.