दहशतवादी कट उधळला

महाराष्ट्र टाइम्स

दिल्ली पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवादी कारवाया उधळून लावल्या आहेत. या कारवाईत सात बांगलादेशी नागरिकांसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. हे दहशतवादी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा 'आयएसआय' आणि बांगलादेशातील संघटनांच्या आदेशावर काम करत होते. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमध्ये झालेल्या धाडींमध्ये ही अटक झाली आहे. पुढील चौकशीसाठी त्यांना दिल्लीला आणले जात आहे.

दहशतवादी कट उधळला
दिल्ली पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवादी संघटनेला उध्वस्त केले आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’ आणि बांगलादेशातील दहशतवादी संघटनांच्या सांगण्यावरून दिल्लीत मोठा घातपाती कट रचल्याच्या आरोपाखाली सात बांगलादेशी नागरिकांसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई आंतरराज्यीय स्तरावर करण्यात आली असून, यातील सहा जणांना तमिळनाडू आणि दोघांना पश्चिम बंगालमधून ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांना पुढील चौकशीसाठी दिल्लीला आणले जात आहे.

पोलिसांनी पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमध्ये एकाच वेळी धाडी टाकून ही अटक केली. अटक करण्यात आलेल्यांपैकी सात जण बांगलादेशी नागरिक असून, ते भारतात बेकायदेशीरपणे घुसले होते. त्यांनी बनावट ओळखपत्रे देखील मिळवली होती, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. या गटाचा दिल्लीत अनेक ठिकाणी बुरहान वानीची छायाचित्रे असलेले पाकिस्तान समर्थक आणि दहशतवाद समर्थक पोस्टर लावण्यात सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे.
या दहशतवाद्यांची साखळी बांगलादेशातून शबीर अहमद लोन उर्फ राजा उर्फ काश्मिरी हा चालवत होता. तो जम्मू-काश्मीरमधील लष्कर-ए-तोयबाचा प्रशिक्षित दहशतवादी आहे. २००७ मध्ये दिल्ली पोलिसांनी त्याला एके-४७ रायफल आणि ग्रेनेडसह शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करताना अटक केली होती.