शहरात विनापरवानगी खोदकामाने गुन्हा

महाराष्ट्र टाइम्स

A private telecom company dug up Gangapur Road in Nashik without municipal permission. This occurred amidst ongoing road repairs for the Sinhasta event. The company and its contractors damaged public property. The Nashik Municipal Corporation has filed a complaint against the company and individuals involved. The illegal digging caused inconvenience to citizens already facing roadwork disruptions.

crime of unauthorized digging in the city violation of municipal rules during 29 road repair works

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात २९ रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना एका खासगी कंपनीने महापालिकेच्या नियमांना केराची टोपली दाखवत विनापरवानगी रस्ता खोदल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. गंगापूररोड परिसरात विनापरवानगी रस्ता खोदून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी नाशिक महानगरपालिकेने संबंधित कंपनी आणि संशयितांविरुद्ध पोलिसांत फिर्याद दाखल करून गुन्हा नोंदविला आहे.

गंगापूररोडवरील पाइपलाइन रोड हा नाशिकमधील उच्चभ्रू आणि रहदारीचा रस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्यावर खासगी टेलिकॉम/केबल कंपनी ‘रेलटेल’ व मक्तेदार संशयित गिरीश केकरे, उपमक्तेदार अभिजीत वाजे, संदेश ब्राह्मणकर, मनोहर सिंग व संबंधितांनी कामासाठी महापालिकेची तांत्रिक पूर्वपरवानगी घेतली नाही. शहरात आधीच रस्ते खोदकामामुळे नागरिक त्रस्त असताना, या कंपनीने प्रशासनाला अंधारात ठेवून रस्ता खोदला. पालिकेच्या पथकाच्या पाहणीत हे उघड झाले.