पेपरफुटीत आणखी चौघांना अटक

महाराष्ट्र टाइम्स

Police have arrested four more people in connection with the paper leak of 12th-grade Chemistry, Physics, and Mathematics exams. The arrested include a principal, a primary teacher, and two tuition class directors. Investigations revealed that two of the accused leaked the question papers. The leak was discovered when a Chemistry paper was found on a student's mobile.

four more arrested in paper leak total arrests rise to eight in nagpur

नागपूर : सेंट उर्सुला येथील बारावीच्या रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित पेपरफुटीप्रकरणी पोलिसांनी आणखी चौघांना अटक केली आहे. यात अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक आणि दोन शिकवणी वर्ग संचालकांचा समावेश आहे. या कारवाईनंतर एकूण अटक संख्या आठवर पोहोचली आहे.

दिनेश कोटांगळे, प्रदीप जांगडे, मनीष शंभरकर आणि संदीप सरटकर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तपासात जांगडे आणि सरटकर यांनीच प्रश्नपत्रिका बाहेर काढल्याचे समोर आले. एका विद्यार्थिनीच्या मोबाइलमध्ये रसायनशास्त्राचा पेपर आढळल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. ‘टेक १’ व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रश्नपत्रिका व उत्तरे शेअर झाल्याचे निष्पन्न झाले. मुख्याध्यापक जांगडे यांनी प्राथमिक शिक्षक सरटकरकडून पेपर मिळाल्याची कबुली दिली. चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.