एप्स्टीनला भेटल्याचे स्मरत नाही

महाराष्ट्र टाइम्स

Former US Secretary of State Hillary Clinton testified before a congressional committee. She stated she does not recall meeting Jeffrey Epstein or knowing about his alleged crimes. Clinton expressed shock upon hearing about Epstein's offenses. Her husband, former President Bill Clinton, also provided testimony regarding his connections to Epstein.

एप्स्टीनला भेटल्याचे स्मरत नाही

‘अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या टोळीचा सूत्रधार जेफ्री एप्स्टीन तसेच, त्याची मैत्रीण घिसलैन मॅक्स्वेल यांनी केलेले गुन्हे व दुष्कृत्यांविषयी मला काहीही माहिती नाही. तसेच, त्याला भेटल्याचे स्मरतही नाही’, असे अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी सांगितले.

अमेरिकी संसदेच्या समितीने हिलरी व त्यांचे पती, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांना याप्रकरणी साक्ष नोंदवण्यासाठी बोलावले आहे. या अंतर्गत हिलरी यांची गुरुवारी बंद दाराआड तब्बल सहा तास साक्ष नोंदवण्यात आली. त्यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली. ही साक्ष त्यांनी आपल्या समाजमाध्यमावर पोस्ट केली. ‘एप्स्टीनच्या गुन्ह्यांविषयी ऐकल्यानंतर कोणत्याही सभ्य व्यक्तीला जितका धक्का बसेल, तितकाच धक्का मलाही बसला’, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी शुक्रवारी एप्स्टीन प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अमेरिकी संसदेच्या समितीसमोर बंद दाराआड साक्ष दिली. एप्स्टीनशी असलेल्या त्यांच्या संबंधांबाबत त्यांनी यावेळी उत्तरे दिली.