बोगस प्रमाणपत्रांना भविष्यात चाप लागावा यासाठी आदिवासी विकास विभागाकडून ‘ई-ट्राइब’ हे ऑनलाइन पोर्टल विकसित करण्यात आले असून त्या माध्यमातून आता विद्यार्थ्यांना त्यांच्या जात प्रमाणपत्राची वैधता मिळविणे शक्य होणार आहे. या पोर्टलविषयी माहिती देताना विभागाचे सचिव विजय वाघमारे म्हणाले की, ‘तंत्रज्ञानाचा वापर करून बोगस प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न विभागाकडून करण्यात येत आहे. एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे हक्क कुणीही हिरावून घेऊ शकणार नाही. तसेच या पोर्टलच्या माध्यमातून याआधीच्या वैधता प्रमाणपत्रांची छाननीही करण्यात येणार आहे’.









