मुंबईत अवतरली गावरान संस्कृती

महाराष्ट्र टाइम्स

मुंबईत गावरान संस्कृतीचे दर्शन घडवणारा 'सुगी महोत्सव २०२६' मुलुंडमध्ये सुरू झाला आहे. हा तीन दिवसीय महोत्सव 'मुंबई स्वयंपाकघर' आणि 'महाराष्ट्र सेवा संघ' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे. महोत्सवात थेट शेतातील ताजा हुरडा हे मुख्य आकर्षण आहे. पंढरपूरनजीकच्या चिंचणी गावातील शेतकऱ्यांनी आयोजित केलेली 'हुरडा पार्टी' मुंबईकरांना आवडत आहे. या महोत्सवात ६५ स्टॉल असून, सहकुटुंब सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत अवतरली गावरान संस्कृती
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

सिमेंटच्या जंगलात हरवलेल्या मुंबईकरांना गावाकडच्या मातीचा सुवास आणि अस्सल गावरान चवीची आठवण करून देणारा ‘सुगी महोत्सव - २०२६’ शुक्रवारपासून मुलुंडमध्ये सुरू झाला आहे. ‘मुंबई स्वयंपाकघर’ आणि ‘महाराष्ट्र सेवा संघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या तीन दिवसीय महोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे. महोत्सवाचे उद्घाटन खाद्यसंस्कृती इतिहासकार मोहसिना मुकादम आणि प्रयोगशील शेतकरी मोहन अनपट यांच्या हस्ते महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड (प.) येथे झाले.

या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे थेट शेतातील ताजा हुरडा. पंढरपूरनजीकच्या चिंचणी गावातील शेतकऱ्यांनी आयोजित केलेली ही ‘हुरडा पार्टी’ मुंबईकरांच्या पसंतीस उतरत आहे. या उपक्रमात तीन पिढ्यांचे उत्साही शेतकरी आणि स्वयंसेवक सहभागी झाले असून एकूण ६५ स्टॉल आहेत. महोत्सवात सहकुटुंब सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.