कचरा, नद्यांवरीलसमस्यांसाठी ‘पुणे रीच’

Contributed byज्येष्ठ रेडिओलॉजिस्ट|महाराष्ट्र टाइम्स

पुण्यातील कचरा, वाहतूक कोंडी आणि नद्यांच्या समस्यांवर 'पुणे रीच' ही नवी संकल्पना पुढे आली आहे. डॉ. प्रकाश भावे यांनी ही संकल्पना मांडली आहे. रिंग रोडच्या विकासातून निधी उभारला जाईल. मेट्रो कॉरिडॉरमुळे भूसंपादनाचा खर्च वाचेल. सार्वजनिक वाहतूक सुधारेल. नदी पुनरुज्जीवन, सांडपाणी प्रक्रिया, कचरा वाहतूक, सौरऊर्जा आणि परवडणारी घरे यांचा यात समावेश आहे. हे पुण्यासाठी स्वयंपूर्ण विकासाचे प्रारूप ठरेल.

pune reach modern solutions for waste and river revitalization

शहरांचा अनियोजित विस्तार, वाढती वाहतूक कोंडी, पाणी व कचरा व्यवस्थापनातील मर्यादा आणि नद्यांची दुरवस्था या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ‘ पुणे रीच ’ ही संकल्पना मांडण्यात आली आहे. ज्येष्ठ रेडिओलॉजिस्ट व शहरी प्रश्नांचे अभ्यासक डॉ. प्रकाश भावे यांनी ही संकल्पना मांडली आहे.

महापालिका, राज्य किंवा केंद्र सरकारच्या थेट निधीवर अवलंबून न राहता, पुण्याभोवती प्रस्तावित १९० किलोमीटर लांबीच्या रिंग बेल्ट मार्गालगत नियोजित विकास व जमिनींच्या लिलावातून निधी उभारण्याचा प्रस्ताव हे या संकल्पनेचे वैशिष्ट्य आहे. कालवे, नदीपात्रे व रेल्वेमार्गांच्या समांतर मेट्रो कॉरिडॉर उभारून भूसंपादनाचा खर्च टाळता येईल, असे सुचवले आहे. यामुळे सार्वजनिक वाहतूक सक्षम होऊन खासगी वाहनांचा वापर कमी होईल, असा दावा डॉ. भावे यांनी केला आहे.

‘पुणे रीच’ या संकल्पनेत नदी पुनरुज्जीवन , पूर्ण सांडपाण्यावर प्रक्रिया, रेल्वेमार्गे कचरा वाहतूक, सौरऊर्जा निर्मिती, पावसाच्या पाण्याची साठवण आणि परवडणाऱ्या दरातील घरांचा समावेश आहे. पुण्यासाठी स्वयंपूर्ण, आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि पर्यावरणाशी सुसंगत शहरी विकासाचे प्रारूप म्हणून ‘पुणे रीच’कडे पाहता येईल,’ असे डॉ. भावे म्हणाले.