लक्षवेधी ‘विजय’

महाराष्ट्र टाइम्स

पनवेल महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्या. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय खानावकर यांनी १० ड प्रभागात तब्बल ७ हजार १०९ मतांचे मताधिक्य मिळवत लक्षवेधी विजय नोंदवला. खानावकर यांना ९ हजार ९१४ मते मिळाली. हा विजय त्यांच्या जनसंपर्काचा परिणाम मानला जात आहे. या विजयामुळे खानावकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लक्षवेधी ‘विजय’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

पनवेल महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्या. भाजपचे सर्व उमेदवार विजयी होणारे अनेक प्रभाग आहेत. परंतु सर्वाधिक चर्चेचा आणि लक्षवेधी विजय १० डचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय खानावकर यांचा ठरला. ७८ नगरसेवकांमध्ये खानावकर तब्बल ७ हजार १०९ मतांचे मताधिक्य मिळविण्यात यशस्वी ठरले.

७८ जागांच्या निवडणुकीत पनवेलमध्ये भाजपने सर्वाधिक ५५ जागांवर विजय मिळविला. भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून ९ नगरसेवक निवडून येणाऱ्या शेकापचा क्रमांक लागतो. महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव उमेदवार विजय खानावकर यांना जागा मिळाली होती. राष्ट्रवादीचा दुसरा उमेदवार भाजपचे माजी नगरसेवक महादेव मधे हेच होते. केवळ जागावाटपातले अंडरस्टँडिंग म्हणून राष्ट्रवादीला दोन जागा देण्यात आल्या. परंतु प्रत्यक्षात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विजय खानावकर हेच राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक होते.

प्रभाग ड मध्ये खानावकर यांचा सामना संतोष जाधव या आघाडीच्या उमेदवाराशी झाला. जाधव यांना अवघी २ हजार ८०५ मते मिळाली. तर खानावकर यांना तीन पट म्हणजेच तब्बल ९ हजार ९१४ इतकी मते मिळाली. त्यामुळे त्यांचा विजय ७ हजार १०९ मतांनी झाला. त्यामुळेच पालिका क्षेत्रात सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे उमेदवार ठरले. त्यांच्या या विजयाबद्दल खानावकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे. खानावकर यांच्या दांडग्या जनसंपर्काचा फायदा भाजपच्या इतर उमेदवारांना होईल याची राजकीय जाणीव आमदार प्रशांत ठाकूर यांना असल्यामुळेच जागावाटपाच्या चर्चेत खानावकर यांची उमेदवारी निश्चित झाली होती. अपेक्षेप्रमाणे त्यांच्या मताधिक्याचा फायदा भाजपला झाला.