कराचीत शॉपिंग मॉलमध्ये आग; सहा मृत्युमुखी

महाराष्ट्र टाइम्स

कराचीतील गुल प्लाझा शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग लागली. या दुर्घटनेत अग्निशमन दलाच्या जवानासह सहा जणांचा मृत्यू झाला. अनेक लोक आत अडकले होते. बचावकार्य सुरू होते. आगीमुळे मॉलची इमारत पूर्णपणे जळून खाक झाली. तळमजला आणि वरचे मजले आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घटनेची चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

horrific fire in karachi shopping mall six dead
कराचीतील गुल प्लाझा मॉलमध्ये भीषण आग लागून अग्निशमन दलाच्या एका जवानासह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी रात्री उशिरा लागलेल्या या आगीमुळे मॉलची इमारत पूर्णपणे जळून खाक झाली असून, १२ तासांनंतरही अनेक लोक आत अडकलेले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

सिंधचे पोलिस महानिरीक्षक (आयजी) जावेद आलम ओधो यांनी दिलेल्या माहितीनुसार, कराची शहरातील एमए जिना मार्गावरील गुल प्लाझा या मॉलमध्ये शनिवारी रात्री १०:४५ वाजता आगीचा भडका उडाला. या दुर्घटनेत सहा जणांचा जीव गेला, तर सुमारे २० लोकांना सुखरूप बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. बचाव पथकांकडून ही माहिती देण्यात आली.
आग लागल्यानंतर तब्बल १६ तास उलटूनही अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. आगीच्या प्रचंड तीव्रतेमुळे शॉपिंग मॉलची इमारत पूर्णपणे कमकुवत झाली होती. तळमजला आणि मॅझेनाइन मजले पूर्णपणे जळून खाक झाले, तर वरच्या दोन मजल्यांनाही आगीने वेढले होते. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.