रंगरेषांतून सांधली नात्यांची वीण

महाराष्ट्र टाइम्स

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने 'क्रिएटिव्ह कॅनव्हास २०२६' ही चित्रकला स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत सुमारे ८०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. लहान मुलांपासून ते आजी-आजोबांपर्यंत तीन पिढ्यांनी यात सहभाग घेतला. स्पर्धेची सहा गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती. तज्ज्ञ शिक्षकांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली.

weaving bonds through colors creative canvas 2026 art competition brings together three generations

कलेच्या माध्यमातून पिढ्यांमधील अंतर सांधत, टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या 'क्रिएटिव्ह कॅनव्हास २०२६' या चित्रकला स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. टिळक नगर विद्यामंदिरच्या पटांगणात रविवारी झालेल्या या स्पर्धेत सुमारे ८०० विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने रंग भरले. लहान मुलांपासून ते आजी-आजोबांपर्यंत तीन पिढ्यांनी एकाच व्यासपीठावर कलेचा आनंद लुटला.

मंडळाने या स्पर्धेची विभागणी सहा गटांमध्ये केली होती. यात शालेय विद्यार्थ्यांसोबतच खुला गटही ठेवण्यात आला होता.

स्पर्धेचे परीक्षण भक्ती भागवत, विनायक कुलकर्णी, सुहिता मोघे, सिद्धी पेंढारकर, लीना चौघुले आणि विनोद अडसुळे या तज्ज्ञ शिक्षकांनी केले. स्पर्धा संपल्यानंतर लगेचच विजेत्यांची निवड करण्यात आली. यावेळी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टचे अतुल गोखले, श्रीपाद कुलकर्णी, अंजली चक्रदेव, तसेच रिअल अकॅडमीचे गणेश पेठे, दीपक पवार, सोहम फायनान्शिअलच्या मेधा वैद्य आणि मंडळाचे कार्यवाह संजय शेंबेकर उपस्थित होते.

यंदा प्रथमच समाविष्ट केलेल्या बालक गटात सुमारे १६० चिमुकल्यांनी सहभाग घेतला होता. विद्या निकेतन शाळेचे सर्वाधिक १३० विद्यार्थी, तर शिवाई बालक विद्यालयाचे ८४ विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेचे विजेते : खुल्या गटात प्रिया राऊत (प्रथम), हितिशा भुसाणे (द्वितीय), इशा सामंत ( तृतीय), आर्या सामंत (उत्तेजनार्थ). आठवी ते दहावीच्या गटात जुईकुमारी ठाकुर (प्रथम), इंद्राक्षी गांधी (द्वितीय), विष्वा राऊत ( तृतीय), स्वरा जंगन (उत्तेजनार्थ). पाचवी ते सातवीच्या गटामध्ये मनस्वी भोसले (प्रथम), साक्षी प्रजापती (द्वितीय), आर्या भंडारी ( तृतीय), केतन गाडेकर (उत्तेजनार्थ). तिसरी ते चौथीच्या गटात स्वस्तिक कानडे (प्रथम), ओवी मोडक(द्वितीय), खुशी राजवढा ( तृतीय).