‘नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनाची पुनर्बांधणी व अन्य कामांची कंत्राटे देण्याच्या बदल्यात भुजबळ कुटुंबीयांना आर्थिक मोबदला मिळाला’, अशा आरोपांबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणातून विशेष पीएमएलए न्यायालयाने शुक्रवारी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ तसेच त्यांच्या कुटुंबीयांसह अन्य आरोपींना आरोपमुक्त केले.
न्यायालयाच्या निर्णयाने या प्रकरणात जवळपास दोन वर्षे तुरुंगवास भोगणारे छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागापाठोपाठ (एसीबी) ईडीलाही मोठा दणका बसला आहे. ‘मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याखाली खटला चालवण्यासाठी मूळ गुन्हा आवश्यक आहे. तोच आता अस्तित्वात राहिला नाही. शिवाय कथित गुन्ह्यातील पैशांनी मालमत्ता जमवल्याचे म्हणत ईडीने आरोपींच्या मालमत्तांवर टांच आणण्याची कारवाई केली असली तरी त्या मालमत्ता गुन्हेगारी पैशांतून जमवल्याचे म्हणता येत नसल्याचे स्पष्ट निरीक्षण एसएएफईएमए









