पोलिस उपनिरीक्षकावर हल्ला; दोघांविरोधात गुन्हा

महाराष्ट्र टाइम्स

इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली. गस्तीवर असलेल्या पोलिस उपनिरीक्षक आदित्य मडावी यांना ओमेश्वर बागडे आणि विकास गडपायले या दोघांनी शिवीगाळ केली. त्यांना मारहाण करून जिवंत जाळण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रामबाग परिसरात हे आरोपी गोंधळ घालत होते.

attack on police inspector case filed against accused in imamwada

गस्तीवर असलेल्या पोलिस उपनिरीक्षक ाला शिवीगाळ करत मारहाण करून जिवंत जाळण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ओमेश्वर चंद्रशेखर बागडे (वय ३४, रा. नारा, कारंजा, जि. वर्धा) व विकास सुनील गडपायले (वय २५, रा. रामबाग) अशी आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, २ मार्च रोजी रात्री पोलिस उपनिरीक्षक आदित्य मडावी हे गस्तीवर होते. त्यावेळी रामबाग परिसरात आरोपी गोंधळ घालत असल्याचे दिसून आले. मडावी यांनी त्यांना तेथून निघून जाण्यास सांगितले. मात्र आरोपींनी उलट आम्हाला मारा, पण आम्ही जाणार नाही असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली.