Grand Celebration Of Womens Day At Swatantryaveer Savarkar Vidya Bhavan
स्वातंत्र्यवीर सावरकर विद्या भवनमध्ये महिलादिन
महाराष्ट्र टाइम्स•
स्वातंत्र्यवीर सावरकर विद्या भवनमध्ये आंतरराष्ट्रीय महिलादिनाचे आयोजन झाले. संस्थेच्या विश्वस्त आरती जोशी यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. मुख्याध्यापिका रूपा शर्मा यांनी महिलांचे समाजातील महत्त्व आणि महिला सक्षमीकरणावर मार्गदर्शन केले. महिलांनी शिक्षण, संस्कार आणि समाजघडणीत बजावलेल्या भूमिकेवर त्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाला पालकांची मोठी उपस्थिती होती. तनुश्री रामटेके यांनी सूत्रसंचालन केले. अंजली सातपुते, अंजली ठाकूर आणि शिक्षिकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर विद्या भवनमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संस्थेच्या विश्वस्त आरती जोशी यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. मुख्याध्यापिका रूपा शर्मा यांनी महिलांचे समाजातील महत्त्व आणि महिला सक्षमीकरणावर आपले विचार मांडले. या कार्यक्रमाला पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या विश्वस्त आरती जोशी यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी त्यांनी उपस्थित सर्व पालकांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका रूपा शर्मा यांनी महिलांचे समाजातील महत्त्व आणि महिला सक्षमीकरण या विषयांवर मार्गदर्शनपर विचार मांडले. महिलांनी शिक्षण, संस्कार आणि समाजघडणीत बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर त्यांनी भर दिला.या कार्यक्रमाला पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनुश्री रामटेके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंजली सातपुते, अंजली ठाकूर यांच्यासह सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.