लग्नाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार

महाराष्ट्र टाइम्स

कल्याणमधील विनायक बंडप्पा बेल्लाले या २९ वर्षीय तरुणाने गोवंडी येथील २९ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. तीन वर्षांपासून तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. फेब्रुवारी २०२३ ते मार्च २०२६ या काळात हा अत्याचार झाल्याचे तरुणीने म्हटले आहे. खांदेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

assault on young woman under the pretext of marriage police are searching for the accused

कल्याण येथे राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणाने गोवंडी येथे राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तीन वर्षे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

विनायक बंडप्पा बेल्लाले असे आरोपीचे नाव आहे. तो कल्याण येथील म्हारळ गावचा रहिवासी असून पीडित तरुणी गोवंडी येथे राहते. सुमारे तीन वर्षांपूर्वी आरोपीने पीडित तरुणीसोबत मैत्री करून तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर लग्नाचे आश्वासन देत आरोपीने तिचा विश्वास संपादन केला. फेब्रुवारी २०२३ ते मार्च २०२६ या कालावधीत आरोपीने आपल्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विनायक बेल्लाले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.