श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे यांच्या वतीने कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीच्या निमित्ताने ‘ गोदा महाआरती ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राची गंगा मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीवरील घाटांवरील आरतीचा अनुभव ठाणेकरांना मिळावा, या उद्देशाने हा कार्यक्रम आज, रविवारी, १५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत कचराळी तलाव , पाचपाखाडी येथे होणार आहे.
या कार्यक्रमात पंडित पंचाक्षरी आणि त्यांचे सहकारी, गंगा गोदावरी पंचकोटी तीर्थ पुरोहित संघ, रामकुंड (नाशिक) यांच्याकडून आरतीचे सादरीकरण करण्यात येणार आहे. गोदावरी घाटांवरील पारंपरिक पद्धतीची आरती, मंत्रोच्चार आणि धार्मिक वातावरणाचा अनुभव नागरिकांना या कार्यक्रमातून घेता येणार आहे.
कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी डॉ. धनश्री लेले असणार आहेत. या उपक्रमाचे नियोजन श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाने केले असून संयोजन निखिल सुळे यांनी केले आहे.
दरम्यान, हिंदू नववर्षानिमित्त गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ७ वाजता श्री कौपिनेश्वर मंदिरातून स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत पालखी सोहळ्यासह पारंपरिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे.
ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘गोदा महाआरती’ आणि नववर्ष स्वागतयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.








