400 Deaths In Pakistani Airstrike Cowardly Attack In Afghanistan
हवाई हल्ल्यात ४०० ठार
महाराष्ट्र टाइम्स•
पाकिस्तानने अफगाणिस्तानात हवाई हल्ले केले. या हल्ल्यात ४०० लोक ठार झाले. पाकिस्तानने दहशतवादी अड्डे लक्ष्य केल्याचा दावा केला. अफगाणिस्तानने मात्र रुग्णालयावर हल्ला झाल्याचा आरोप केला. भारताने पाकिस्तानच्या या हल्ल्याचा निषेध केला. दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.
पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये ४०० जणांचा मृत्यू झाला असून २५० जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानने दहशतवादी अड्डे आणि शस्त्रसाठा नष्ट केल्याचा दावा केला आहे, तर अफगाणिस्तानने रुग्णालयांवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर, भारताने पाकिस्तानच्या या कृतीचा तीव्र निषेध केला आहे.
पाकिस्तानने 'गझब लिल हक' नावाचे लष्करी अभियान सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत, पाकिस्तानने १६ मार्चच्या रात्री अफगाणिस्तानमधील काबूल आणि नांगरहार या शहरांमधील सहा ठिकाणांवर हवाई हल्ले केले. पाकिस्तानच्या माहितीमंत्री अताउल्लाह तरार यांनी सांगितले की, "दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तांत्रिक सुविधांचे बांधकाम आणि शस्त्रभांडार ही काबूलमधील दोन ठिकाणे आणि नांगरहारमधील चार लष्करी आस्थापना उद्ध्वस्त केली आहेत." पाकिस्तानने आतापर्यंत ६८४ तालिबान्यांना ठार मारल्याचा दावा केला आहे, तर अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या अनेक सैनिकांना मारल्याचे म्हटले आहे.भारताने पाकिस्तानच्या या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. भारताने म्हटले आहे की, "पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निष्पापांचे प्राण घेतले आहेत. आता ते आपले पाप झाकण्यासाठी लष्करी तळांना लक्ष्य केल्याचा दावा करीत आहेत. मात्र, हा भ्याड हल्ला असून, त्याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे."