Acid Attack On A Student In Sangamner Taluka Critically Injured
विद्यार्थिनीवरॲसिड हल्ला
महाराष्ट्र टाइम्स•
संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे धक्कादायक घटना घडली. शाळा सुटल्यावर घरी परतणाऱ्या सहावीतील विद्यार्थिनीवर एका अज्ञात तरुणाने ॲसिड फेकले. या हल्ल्यात ती मुलगी जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. यापूर्वी रणखांब येथेही एका विद्यार्थिनीवर हल्ला झाला होता. ही दुसरी घटना असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
अहिल्यानगर: संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे शाळेतून घरी परतणाऱ्या सहावीतील एका अल्पवयीन मुलीवर अज्ञात तरुणाने ॲसिड हल्ला केला. या घटनेनंतर आरोपी पळून गेला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. लोणी येथील रुग्णालयात पीडित मुलीवर उपचार सुरू आहेत. ही नगर जिल्ह्यातील दुसरी धक्कादायक घटना आहे. याआधी रणखांब येथे नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर शस्त्राने हल्ला झाला होता.
वडगावपान गावात शाळा सुटल्यानंतर ही मुलगी घरी जात होती. त्याचवेळी एका अनोळखी तरुणाने तिच्यावर ॲसिड फेकले. या हल्ल्यात ती मुलगी जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस लगेच शाळेत पोहोचले. त्यांनी परिसराची पाहणी केली आणि आरोपीचा शोध सुरू केला.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नगर जिल्ह्यात अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यापूर्वी सोमवारी तालुक्यातील रणखांब येथे नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीवर शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या दोन्ही घटनांनी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.