मालमत्ताकराची वसुली होईना

महाराष्ट्र टाइम्स

महापालिका मालमत्ता कराची थकीत वसुली करत आहे. कर न भरलेल्या चार मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. ४२ व्यावसायिक मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. शहरात ५० टक्क्यांहून अधिक मालमत्ताधारक थकबाकीदार आहेत. महापालिकेने ५०० कोटी रुपयांचे कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. झोन कार्यालयांकडून कर वसुलीची प्रक्रिया सुरू आहे.

मालमत्ताकराची वसुली होईना
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

महापालिकेने मालमत्ता कराच्या थकीत वसुलीसाठी मालमत्ता जप्तीची मोहीम हाती घेतली आहे. झोन -५ अंतर्गत तीन तर झोन-३ अंतर्गत एक अशा चार मालमत्ताधारकांनी कर न भरल्याने मालमत्तांना सील करण्यात आल्याचे अधिकारीसूत्रांनी दिली. आतापर्यंत सात कोटी ७५ लाख ९७ हजार ९८४ रुपयांचा कर थकल्यामुळे ४२ व्यावसायिक मालमत्ता जप्तीची कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती अधिकारीसूत्रांनी दिली.

शहरातील ३ लाख २० हजार मालमत्तांपैकी केवळ एक लाख ३३ हजार ४४१ मालमत्ताधारकांकडून कर वसूल झाला आहे. शहरात ५० टक्क्यांपेक्षा अधिक मालमत्ताधारक कराचे थकबाकीदार असल्याचे आकडेवारीतून समोर आल्याचे अधिकारीसूत्रांनी सांगितले. मालमत्ताधारकांकडून १९५ कोटी ७० लाख रुपयांचा कर वसूल झाला तर पाणीपट्टीपोटी १९ कोटी ५० लाख रुपयांचा कर महापालिकेकडे जमा झाला.

मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीची प्रक्रिया सुरू आहे. दोन्ही करापोटी आजपर्यंत २१५ कोटी ३१ लाख रुपयांचा कर वसूल झाला आहे. तर थकबाकीबाबत ३८ मालमत्तांना सील लावले. अद्याप निम्म्यापेक्षा मालमत्ताधारकांनी अद्यापही कर भरलेला नसल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे. महापालिकेने कर वसुलीचे उद्दिष्ट ५०० कोटी रुपयांचे ठेवले आहे. कराच्या वसुलीची प्रक्रिया झोन कार्यालयाकडून सुरू आहे. झोन निहाय थकबाकीदार मालमत्ताधारकांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. परंतु, अनेक मालमत्ताच्या कर वादात अडकलेला असल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळे कराची वसुली निश्चित उद्दिष्टाचा आकडा पार करील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार शहरात तीन लाख २० हजार मालमता आहेत. त्यापैकी एक लाख ३३ हजार ४४१ मालमत्ताधारकांनी आत्तापर्यंत १९५ कोटी ७० लाखाचा मालमत्ता कर भरला आहे; तसेच ३६ हजार नळ जोडणीधारकांनी १९ कोटी ५० लाखाची पाणीपट्टी भरली आहे.