शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनात भेट घेतली. आखाती देशांतील सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत पंतप्रधानांच्या व भारत सरकारच्या भूमिकेला ‘एनडीए’चा मित्र पक्ष म्हणून शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा आहे; आम्ही देशासोबत आहोत, असा शब्द शिंदे यांनी पंतप्रधानांना दिला.
या कसोटीच्या काळात देशात राजकीय पक्षभेद विसरून एकत्र येण्यास काही लोक तयार नाहीत व विरोधक युद्धजन्य परिस्थितीचा राजकारणासाठी वापर करीत असून, हे दुर्दैवी असल्याची टीका शिंदेंनी केली. राज्यातील विकासकामे आणि विविध प्रश्न; तसेच पंतप्रधानांसोबत महाराष्ट्रातील विषयांवरही सकारात्मक चर्चा झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. शिंदे यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, बुधवारी दिल्ली दौऱ्यावर आहेत.
उर्वरित मजकूर... फ्रंट पेज २








