ग्राहकांनी स्वतःच्या हक्काचे संरक्षण करावे

महाराष्ट्र टाइम्स

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ग्राहकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले. वस्तू खरेदी करताना गुणवत्ता, किंमत आणि दर्जा तपासावा. फसवणूक झाल्यास ग्राहक न्यायालयात दाद मागावी. अन्नपदार्थांतील भेसळ किंवा इतर तक्रारींसाठी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. 'फूड सेफ्टी' ॲपवरही तक्रार नोंदवता येते. स्वतःच्या हक्कांचे संरक्षण करा.

protection of customer rights awareness is essential

बाजारपेठेत मिळणाऱ्या विविध वस्तू, उत्पादने याची गुणवत्ता, किंमत आणि दर्जेदारपणा याबाबतच्या नोंदी पाहूनच ग्राहकाने वस्तूंची आणि उत्पादनाची खरेदी करावी. ग्राहक म्हणून आपण आपल्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी जागरूक रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी येथे केले.

जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अंकित, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविण फुलारी, सहाय्यक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन विभाग दयानंद पाटील, वजने व मापे विभाग शिवाजी मुंडे, डॉ. मिलिंद जोशी, ग्राहक संरक्षण समितीचे अशासकीय सदस्य राजेश मेहता, संगीता धारूरकर, धनंजय मुळे, नानक वेदी, अशोक ठोंबरे, शेख अनवर शेख कौसर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, ‘फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकाने स्वतः उत्पादन किंवा वस्तू याबाबतची खातरजमा करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर झालेल्या फसवणुकीबाबत ग्राहक न्यायालयात दाद मागणे ही महत्त्वाचे आहे. जागरूक राहून स्वतःच्या हक्काचे संरक्षण करणे तसेच इतरांनाही होणाऱ्या फसवणुकीपासून परावृत्त करणे आवश्यक आहे.’

भेसळ किंवा अन्नपदार्थांच्या तक्रारीबाबत १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार दाखल करण्याचे आवाहन सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग दयानंद पाटील यांनी केले. 'फूड सेफ्टी' या अँपवर ज्या अन्नपदार्थाची चव, गुणवत्ता, भेसळ असेल अशा पदार्थांविषयी तक्रार नोंदण्याची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध आहे. त्याचा उपयोग आपल्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी करावा असे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.