Inauguration Of Modi Script Training Class And Important Religious Events In Pune
मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन
महाराष्ट्र टाइम्स•
पुण्यात मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन होणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जाईल. पांडुरंग बलकवडे मराठ्यांच्या इतिहासातील मोडी कागदपत्रांच्या महत्त्वावर व्याख्यान देतील. एरंडवणे येथील श्री शनी मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाला. महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
पुणे: भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे मोडी लिपी प्रमाणपत्र परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव आणि नवीन प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन सोमवारी, १ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मंडळाच्या राजवाडे सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे 'मराठ्यांच्या इतिहासातील मोडी कागदपत्रांचे महत्त्व' या विषयावर मार्गदर्शन करतील.
एरंडवणे येथील गणेशनगर भागातील श्री शनी मंदिराचा जीर्णोद्धार आणि नूतनीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. या निमित्ताने शनिवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील शंभरहून अधिक महिलांनी डोक्यावर जलकलश घेऊन नगरप्रदक्षिणा केली. संपूर्ण परिसर फुलांच्या माळांनी सजवण्यात आला होता. या सोहळ्याला खासदार मेधा कुलकर्णी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, आबा बागुल, संदीप खर्डेकर, बाळासाहेब दाभेकर आणि शनि मारुती बाल गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दीपक केशवराव निकम उपस्थित होते.महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनमध्ये जतन फाउंडेशनच्या अर्चना झेंडे आणि रवींद्र झेंडे यांनी फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी फाउंडेशनचे विश्वस्त सचिव सुभाष लोमटे यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर अमरनाथ सिंग दिग्दर्शित 'सत्यशोधक समाज' हा माहितीपट दाखवण्यात आला. या कार्यक्रमाला फाउंडेशनचे कोषाध्यक्ष आनंद थोरात, दीपा पवार, पुष्पा क्षीरसागर, राहुल भोसले, किरण पाटील आणि संतोष केंगले उपस्थित होते.