Victory Of Riddhi Ayan And Saksham In Junior Tennis Tournament
अयान, सक्षम, रिद्धीचे विजय
महाराष्ट्र टाइम्स•
पुण्यात सुरू असलेल्या 'गद्रे मरीन-एमएसएलटीए' आयटीएफ ज्युनिअर टेनिस स्पर्धेत रिद्धी शिंदे, अयान शेट्टी आणि सक्षम भन्साळी यांनी पात्रता फेरीत विजय मिळवला. डेक्कन जिमखाना येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अनेक खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत पुढील फेरीत प्रवेश केला. या सामन्यांमध्ये चुरशीचे सामने पाहायला मिळाले.
पुणे येथे सुरू असलेल्या ‘गद्रे मरीन-एमएसएलटीए’ आयटीएफ (ग्रेड-३) ज्युनिअर टेनिस स्पर्धेत रिद्धी शिंदे , अयान शेट्टी आणि सक्षम भन्साळी यांनी पात्रता फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. डेक्कन जिमखाना येथे ही स्पर्धा रंगत आहे.
या पात्रता फेरीत अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले. मुलींच्या गटात नाव्या शर्माने आरोही देशमुखला ६-३, ६-४ असे हरवले. अव्यक्ता रायावरपूने दिया अग्रवालवर ६-३, १-६, १०-५ असा विजय मिळवला. अद्विता गुप्ताने काव्या देशमुखला ६-२, ६-२ असे सहज हरवले. देवश्री महाडेश्वरने अन्वेषा धरला ६-०, ६-३ असे पराभूत केले. दीप्ती वेंकटेशनने याना अरोराला ६-१, ६-० असे धूळ चारली. तर, रिद्धी शिंदेने वीरा हारपुडेला ६-१, ६-३ असे नमवले.मुलांच्या गटातही चुरशीचे सामने झाले. अयान शेट्टीने आर्य दुबेला ६-१, ६-३ असे हरवले. नमित भाटियाने अथर्व श्रीरामोजूविरुद्ध ६-७(४), ६-१, १४-१२ असा संघर्षमय विजय मिळवला. नीव कोठारीने विश्वजित सणसला ३-६, ७-५, १२-१० असे हरवून आगेकूच केली. उदय कौलने ऋषभ रामननला ६-०, ६-१ असे सहज हरवले. सक्षम भन्साळीने ईशान देव शिवकुमार आय. ला ६-३, ६-३ असे पराभूत केले. अद्वित तिवारीने रुनमन महेशला ४-६, ७-५, १०-४ असे हरवून पुढील फेरीत प्रवेश केला.