Indian Hockey Teams Achieve Spectacular Victory In Asian Games
हॉकीत भारताच्या दोन्ही संघांचे विजय
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
भारताच्या महिला आणि पुरुष संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत दणदणीत विजय मिळवून आपल्या मोहिमेला जबरदस्त सुरुवात केली. भारतीय महिलांनी ‘ब’ गटात रविवारी उझबेकिस्तानवर १९-० असा मोठा विजय मिळवला. यात दीपिकाने आठ गोल केले. यानंतर भारतीय पुरुषांनी इंडोनेशियाला १३-१ने नमवले. यात दिलप्रीतसिंहने चार गोल नोंदवले.
महिला गटात भारताने उझबेकिस्तानला संधीच दिली नाही. भारताकडून दीपिकाने (८, २२, २५, ३३, ३६, ३८, ४१, ५४ मि.) सर्वाधिक आठ गोल नोंदवले. लालरेमसियामी (७ मि.), ईशिका (११, ४२, ५४ मि.), बलजित कौर (१२ मि.), नेहा (१८ मि.), नवनीत कौर (२३, ४५ मि.), ललथांतलुआंगी (४३, ५१ मि.) आणि साक्षी राणा (४३ मि.) यांनीही गोल केले. भारताने उझबेकिस्तानला हॉकीचे धडे दिले. भारताचा पुढील सामना सोमवारी इंडोनेशियाविरुद्ध होईल.पुरुषांमध्ये गतविजेत्या भारताने ‘अ’ गटातील लढतीत इंडोनेशियाचा १३-१ असा पराभव केला. दिलप्रीत सिंहने (१८, १९, ३७, ४९ मि.) चार गोल नोंदवून विजयात मोलाचा वाटा उचलला. शिलानंद लाक्रा (६, ३५ मि.) आणि सुखजित सिंग (३८, ४८ मि.) यांनी प्रत्येकी दोन गोल केले. अभिषेक (१२ मि.), राजिंदर सिंग (१९ मि.), मनदीप सिंग (२१ मि.), कर्णधार हरमनप्रीत सिंग (२८ मि.) आणि जुगराज सिंग (४७ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारताचा पुढील सामना मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध होईल.
‘हॉकी इंडिया’ने निळ्या जर्सीत परतण्याची घोषणा केली असतानाही भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ आशियाई क्रीडा स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात भगव्या जर्सीत उतरले. गेल्या महिन्यात झालेल्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ प्रथमच भगव्या जर्सीत मैदानात उतरल्याने वाद निर्माण झाला होता. ‘हॉकी इंडिया’ अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी या बदलास संघटनेच्या नेतृत्वाची मंजुरी नसल्याचे म्हटले होते. निळ्या रंगामुळे निळ्या मैदानावर खेळाडू दिसण्यात अडचण येत असल्याने जर्सी बदलल्याचे सांगण्यात आले.