गणेश विसर्जनासाठी गेलेले दोघे बुडाले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
two students drown during ganesh visarjan in river
नांदेड : गणेश विसर्जनासाठी गोदावरी नदीपात्रात गेलेल्या अभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थ्यांचा रविवारी दुपारी बुडून मृत्यू झाला. नवीन नांदेड परिसरातील विष्णुपुरी येथील काळेश्वर घाटावर दुपारी बाराला ही दुर्घटना घडली.

बजरंग बिरू येडूरे (वय १८, रा. किनी, ता. देगलूर) आणि दीपक मारुती सोळुंके (वय २०, रा. बाऱ्हाळी, ता. मुखेड) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही वाडी पाटीजवळील मातोश्री प्रतिष्ठान अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दोघेही आपल्या मित्रांसोबत काळेश्वर मंदिर परिसरातील गोदावरी नदीकाठी गणेश विसर्जनासाठी आले होते. विसर्जन आटोपल्यानंतर दोघेही पोहण्यासाठी नदीत उतरले. मात्र, पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात ओढले गेले व बुडाले.