Significance Of Bhosale Royal Familys Ganapati Immersion Ceremony
भोसले राजघराण्याच्या गणपतीचे विसर्जन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
भक्तिगीतांचा सुरेल संगम आज
अमृताब्दग्रंथांचे प्रकाशन २७लानागपूर : भोसले राजघराण्याच्या गणपतीचे रविवारी विधिवत विसर्जन करण्यात आले. श्रीमंत मुधोजीराजे भोसले यांच्या महाल येथील सीनियर भोसला पॅलेसमधील गणेशोत्सव ाचे यंदा २९८वे वर्ष होते. सप्तमीच्या दिवशी गणरायाच्या मूर्तीची विधिवत पूजा करून पारंपरिक पद्धतीने पालखीतून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. भोसले राजघराण्याच्या ऐतिहासिक वाड्यातील हा गणेशोत्सव नागपूरच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा महत्त्वाचा भाग मानला जातो. गणरायाला निरोप देताना उपस्थित भाविकांनी भक्तिभावाने जयघोष केला.
भक्तिगीतांचा सुरेल संगम आज
नागपूर : स्वरसप्तक संस्थेतर्फे ‘वाहतो २१ गीतांची जुडी’ या संकल्पनेअंतर्गत भक्तिगीतांचा कार्यक्रम सोमवारी, २१ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. भरतनगर येथील श्री दत्त मंदिरात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होईल. यात विजय देशपांडे, प्रतीक्षा पट्टलवार, अश्विनी लुले, संगीता भगत, अनुजा जोशी, अश्विनी ओझरकर, लता पटले, आदित्य फडके, श्याम देशपांडे आणि आर्या देशपांडे भक्तिगीते सादर करतील. मंगेश पटले संगीत संयोजक असून निवेदन कांचन चुटके करतील. नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्वरसप्तकतर्फे करण्यात आले आहे.
अमृताब्दग्रंथांचे प्रकाशन २७ला
नागपूर : संस्कृत भाषा प्रचारिणी सभेतर्फे साकारण्यात आलेल्या अमृताब्दग्रंथमालिकेतील ग्रंथांचे प्रकाशन रविवार, २७ सप्टेंबर रोजी होणार आहे. सिव्हिल लाइन्स येथील जवाहर वसतिगृहाजवळील संस्कृत भवन येथे सायंकाळी ४.३० वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विदुषी डॉ. लीना रस्तोगी, डॉ. मधुकेश्वर भट्ट आणि रवींद्र भुसारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्कृत भाषा प्रचारिणी सभेचे सचिव डॉ. चंद्रगुप्त वर्णेकर आणि कार्यकारी संपादिका डॉ. वीणा गानू यांनी केले आहे.
‘पावसाने निरोप
घेतला का?’
नागपूर : महालक्ष्मी प्रसादाच्या दिवशी, १८ सप्टेंबरला शहरात जोरदार पाऊस झाला. त्याआधी काही दिवस अधूनमधून तुरळक सरी कोसळत होत्या. मात्र, त्यानंतर पावसाने जणू विश्रांती घेतली असून शहरात पुन्हा उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. दुपारच्या वेळी ऊन तापत असल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास होत आहे. सप्टेंबर अखेर जवळ येत असताना पावसाचा जोर कमी झाल्याने ‘पावसाने यंदा निरोप घेतला का’, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. हवामान खात्याच्या पुढील अंदाजाकडेही शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.