गुवाहाटी : प्रथम फलंदाजीस निमंत्रित केलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे सहा फलंदाज ११ षटकांत ९४ धावांत परतले होते. मात्र या पडझडीत टिकलेला रजत पाटीदार चे अर्धशतक तसेच वेंकटेश अय्यर आणि शेफर्डच्या फटकेबाजीमुळे ‘बेंगळुरू’ने राजस्थान रॉयल्सविरुद्ध द्विशतकी धावसंख्या उभारली. ‘बेंगळुरू’ने १४ षटकातील ७ बाद १२५वरून ८ बाद २०१ अशी मजल मारली. स्कोअरबोर्ड : ‘बेंगळुरू’ ८ बाद २०१(विराट कोहली ३२ - १६ चेंडूंत ७ चौकार, रजत पाटीदार ६३ - ४० चेंडूंत ४ चौकार व ४ षटकार, रोमारिओ शेफर्ड २२, वेंकटेश अय्यर नाबाद २९, आर्चर ३-०-३३-२, बिश्णोई ४-०-३२-२) वि. ‘राजस्थान’.








