भारताच्या आशा पूर्णपणे वैशालीवरच

Contributed byम. टा. विशेष क्रीडा प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत रमेशबाबू वैशालीने तिसरे स्थान मिळवले. यामुळे ती कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरली. सुरुवातीला प्रज्ञानंदकडून अपेक्षा होत्या. मात्र, आता स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात वैशालीवरच भारताच्या आशा आहेत. तिने मागील फेऱ्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आघाडीवर असलेल्या वैशाली आणि इतर खेळाडूंमध्ये गुणांचा फारसा फरक नाही. त्यामुळे अंतिम फेऱ्यांमध्ये चुरस वाढली आहे.

भारताच्या आशा पूर्णपणे वैशालीवरच

वर्ल्ड कप महिला बुद्धिबळ स्पर्धेत तिसरी आल्यामुळे रमेशबाबू वैशाली कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरली होती. त्या वेळी तिच्याकडून फारशा अपेक्षा कोणाला नव्हत्या. कँडिडेट्स स्पर्धा सुरू झाली त्या वेळी वैशालीचा लहान भाऊ प्रज्ञानंद कशी कामगिरी करणार याची चर्चा सुरू होती. मात्र, स्पर्धेतील अखेरच्या चार फेऱ्या शिल्लक असताना सायप्रसमधील या स्पर्धेत भारताच्या सर्वाधिक आशा वैशालीवरच आहेत.

वैशालीने गेल्या पाचपैकी तीन फेऱ्या जिंकल्या आहेत. तिने अन्य स्पर्धकांना किमान अर्ध्या गुणाने मागे टाकले आहे. या स्पर्धेत कमालीची चुरस आहे. अव्वल क्रमांकावरील वैशाली आणि सातव्या क्रमांकावरील दिव्या देशमुख यांच्यात दीड गुणांचाच फरक आहे.

वैशालीची सुरुवात चांगली नव्हती. तिने झू जिनेरविरुद्धच्या पराभवानंतर कात टाकत जोरदार मुसंडी मारली. अर्थात आगामी आव्हान सोपे नाही. म

प्रज्ञानंद आणि दिव्या सातव्या क्रमांकावर आहेत. प्रागचे केवळ चार गुण आहेत. आघाडीवर असलेल्या जावोखिर सिंदारोव याचे आठ गुण आहेत. त्यामुळे प्रागने सर्व लढती जिंकल्या तरीही तो आघाडीवर येणार नाही. दिव्या देशमुखला त्या तुलनेत संधी आहे. मात्र बुद्धिबळाच्या स्पर्धेत अंतिम टप्प्यात दीड गुणांची पिछाडी भरून काढणे सोपे नसते. यामुळे आशा आता केवळ वैशालीवरच आहेत.