‘रणांगण’चेआज अभिवाचन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणेकरांना 'रणांगण' कादंबरीचे अभिवाचन अनुभवता येणार आहे. शनिवारी (दि. ११) सायंकाळी साडेसहा वाजता राजमुद्रा सभागृहात हा प्रयोग सादर होईल. प्रसिद्ध निवेदक सिद्धार्थ देशपांडे आणि मुक्ता गोडबोले अभिवाचन करतील. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. पुण्यानंतर मुंबईसह इतर ठिकाणीही याचे आयोजन केले जाईल.

recitation of vishram bedekars ranangan novel in pune

पुणे : वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ साहित्यिक विश्राम बेडेकर लिखित ‘ रणांगण ’या कादंबरीचे अभिवाचन पुणेकरांना अनुभवता येणार आहे. शनिवारी (दि. ११) सदाशिव पेठेतील देशमुख अँड कंपनीच्या राजमुद्रा सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता याचा प्रयोग होणार आहे.

तत्कालीन युरोपमधील परिस्थिती, पहिले विश्व युद्ध संपल्यानंतर दुसऱ्या विश्वयुद्धाच्या अलीकडचा काळ ‘रणांगण’ कादंबरीत मांडला आहे. प्रसिद्ध निवेदक सिद्धार्थ देशपांडे यांची ही संकल्पना असून, त्यांच्यासह देशमुख अँड कंपनीच्या मुक्ता गोडबोले अभिवाचन करणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य खुला आहे. पुण्यानंतर मुंबईसह विविध ठिकाणी कार्यक्रम सादर होणार असून, मुंबईमध्ये यामध्ये अभिनेत्री दीप्ती भागवत सहभागी होणार आहेत.