मुख्यत्वे गायमुख घाट रस्त्याचा काही भाग ठाणे व काही भाग मीरा- भाईंदर पालिकेच्या हद्दीत येतो. याआधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याची डागडुजी करण्यात येत होती. त्यानंतर गेल्या वर्षी ठाणे आणि मीरा - भाईंदर महापालिकेला या रस्त्याच्या कामाची जबाबदारी देण्यात आली. एमएमआरडीएच्या वतीने भविष्यात या रस्त्यांवर विविध कामे केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. येथील काही भाग वनविभागाच्या हद्दीत येतो. त्यामुळे विविध यंत्रणांच्या समन्वयाचा अभाव दिसून येतो.








