रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील तरुणीच्या निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपी अनिस मोहम्मद खान मालदार याला शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ठाणे येथून ताब्यात घेण्यात आले. रविवारी त्याला अलिबाग येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
लोणेरे येथील एका लॉजमध्ये २० एप्रिल रोजी एका २२ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते. संपूर्ण रायगड जिल्ह्यात या घटनेमुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपी अनिस हा मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील तळवडे मालदारवाडी येथील रहिवासी आहे.








