कर्मयोगी अंकुशराव टोपे मत्स्योदरी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात राष् ट्रीय आपत् ती प्रतिसाद दलामार्फत ( एनडीआरएफ) अचानक उद्भवणाऱ्या रासायनिक आपत्तीजनक परिस्थिती कशी हाताळली पाहिजे यासाठी ‘टेबल-टॉप एक्सरसाइज’ आणि ‘ मॉकड्रिल ’करण्यात आली.
अंकुशनगर ता. अंबड येथील साखर कारखान्यातील इथेनॉल टाकी व पाईपलाईनमधून गळती होऊन कारखाना परिसरात आग लागल्याचा काल्पनिक प्रसंग गृहीत धरून सराव करण्यात आला. यावेळी पथकाने इथेनॉलच्या ‘मटेरियल सेफ्टी डेटा शीट’बाबत माहिती दिली तसेच प्रत्यक्ष आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक सादर केले. या मॉक ड्रिलचा उद्देश आपत्कालीन परिस्थितीत जनजागृती करणे तसेच त्रुटींचे विश्लेषण करणे हा होता पथकाने बचाव कार्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध उपकरणे व साधनांची माहिती दिली. या वेळी माजी मंत्री राजेश टोपे,औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे उमाकांत पारधी, तहसीलदार विजय चव्हाण, पी. व्ही. सुरसे, सहसंचालक नंदकिशोर देशमुख, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दिपक काजळकर उपस्थित होते.







