वेरूळ येथील गुरुदेव समंतभद्र विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक गुलाबचंद बोराळकर यांचे वडील हिरामण बोराळकर यांच्या स्मरणार्थ वक्तृत्व स्पर्धा आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रशालेतील जवळपास ३०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
अध्यक्षस्थानी बाकलीवार विद्यालय वाशीमचे माजी मुख्याध्यापक अभयकुमार काळे, तर रुपेश वायकोस, मिलिंद गोसावी, संजय महाजन, राजेंद्र अंबरकर, गुलाबचंद बोराळकर, पर्यवेक्षक सुकुमार नवले उपस्थित होते. मुख्याध्यापक गुलाबचंद बोराळकर यांनी त्यांचे वडील हिरामण बोराळकर यांच्या विषयी माहिती दिली. प्राथमिक विभागातून गौरी गायके, आराध्या मिसाळ, शिवम साबळे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला. प्रोत्साहनपर बक्षीस रितिका जाधव, सिद्धी गायकवाड, मनस्वी मोठे यांना देण्यात आले. माध्यमिक विभागातून संस्कृती साबळे, मनस्वी मोठे, प्रज्वल आवटे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला. सोहम खामकर, मानसी दळे, अक्षरा वाहूळ यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.









