कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधी कार्यशाळा

महाराष्ट्र टाइम्स

कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व ओळखून एक विशेष कार्यशाळा आयोजित केली जात आहे. या कार्यशाळेत १८ हून अधिक एआय टूल्स शिकवले जातील. फोटो, व्हिडिओ, संगीत, सोशल मीडिया ग्राफिक्स आणि जाहिरात निर्मिती यांसारख्या गोष्टींचा समावेश असेल. एआयद्वारे व्हॉइसओव्हर, उच्चार बदलणे, संहितालेखन आणि कार्टून निर्मितीचे कौशल्य मिळेल. १६ ते २५ मार्च दरम्यान ही ऑनलाइन कार्यशाळा होणार आहे. अभिषेक तवसाळकर मार्गदर्शन करतील.

कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधी कार्यशाळा
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

या कार्यशाळेत १८हून अधिक ‘ एआय टूल्स ’ शिकवले जाणार आहेत. यामध्ये फोटो, व्हिडिओ, म्युझिक, सोशल मीडिया ग्राफिक्स, जाहिरात अशा विविध गोष्टी शिकता येणार आहेत. यासह एआयद्वारे व्हॉइसओव्हर , स्त्री-पुरुषांचे आवाज कसे काढावे, उच्चारांची शैली कशी बदलावी, संहितालेखन, निबंधलेखन, मजकुरांसह कार्टूनही तयार करण्यासह योग्य ‘एआय प्रॉम्प्ट’ तयार करण्याचे कौशल्य शिकता येईल.

शिक्षण, व्यवसाय, कलेसह विविध क्षेत्रांतील ‘एआय’चा वाढता वापर आणि त्यातील करिअरच्या संधी लक्षात घेऊन कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) कौशल्य आत्मसात करणे महत्त्वाचे ठरत आहे. ही बाब लक्षात घेऊन १६ ते २५ मार्चदरम्यान एआय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.


कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधी कार्यशाळा

ही कार्यशाळा ऑनलाइन होणार असून, घरबसल्या प्रात्यक्षिक आणि भरपूर सरावासह एआयचे विश्व उलगडता येणार आहे. एआयसंबंधी विविध संकल्पनांसह त्याचा वापर कसा करावा, त्यातील विविध तंत्रे याची माहिती या कार्यशाळेत मिळेल.

पौरस देशपांडे यांची ‘स्प्रेडिंग नॉलेज’ ही संस्था आणि ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’तर्फे विशेष कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत एआय आणि वेबसाइटतज्ज्ञ अभिषेक तवसाळकर मार्गदर्शन करतील. तवसाळकर हे अनेक वर्षांपासून कॉम्प्युटर इंजिनीअरिंग क्षेत्रात कार्यरत असून, शंभरहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संस्थांसाठी त्यांनी काम केले आहे.

ही कार्यशाळा सशुल्क होणार आहे. लाइव्ह स्वरूपात होणाऱ्या या कार्यशाळेचे रेकॉर्डिंग पुढील दोन महिने पाहण्यासाठी उपलब्ध असेल. कार्यशाळेच्या अधिक माहितीसाठी ९८१९०११७९१ (फोन), ९८६९०११९३१ (व्हॉट्सॲप), www.spreadingknowledge .in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.