रोज साडेतीन हजार फुकटे

महाराष्ट्र टाइम्स

मध्य रेल्वेने प्रवाशांकडून मोठा दंड वसूल केला आहे. लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत हजारो विनातिकीट प्रवाशांवर कारवाई झाली. एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या काळात २०२ कोटींहून अधिक दंड वसूल करण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत कारवाईत वाढ झाली आहे. दंडाच्या रकमेतही लक्षणीय वाढ दिसून आली आहे.

traveling without a ticket leads to huge fines for passengers

लोकलमध्ये दररोज तीन हजार ६७७ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात येत आहे. मध्य रेल्वेने एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान उपनगरीय रेल्वे आणि लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेसमध्ये केलेल्या कारवाईत विनातिकीट प्रवाशांकडून २०२ कोटी ७६ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

मध्य रेल्वेवरील नियमित मेल-एक्स्प्रेस आणि विशेष गाड्यांमध्ये ही तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. लोकल तपासणीत यंदाच्या जानेवारी महिन्यातच तीन लाख ५८ हजार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. एप्रिल ते जानेवारीदरम्यान मुंबई विभागाने लोकलमधील नऊ लाख ४९ हजार प्रवाशांकडून २७ कोटी ३९ लाख रुपये दंड वसूल केला आहे.


रोज साडेतीन हजार फुकटे

लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये आर्थिक वर्ष २०२४-२५मधील एप्रिल ते जानेवारी या कालावधीत ३४ लाख ३४ हजार विनातिकीट किंवा अयोग्य तिकिटासह प्रवास करणारे प्रवासी पकडण्यात आले. दोषी प्रवाशांकडून २०२ कोटी ७६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या वर्षी याच कालावधीत ३१ लाख २८ हजार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली होती. यंदा त्यात सुमारे ९.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वसूल केलेल्या दंडाच्या रकमेतील वाढ तर २१ टक्क्यांहून अधिक आहे.