‘महिंद्रा’ची १५ हजार कोटींची गुंतवणूक

महाराष्ट्र टाइम्स

विदर्भ ॲडव्हांटेज महोत्सवात मोठे औद्योगिक करार झाले. महिंद्रा अँड महिंद्रा १५ हजार कोटींची गुंतवणूक करून नागपुरात ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करणार आहे. सुपर स्मेल्टर्स गडचिरोलीत १० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. एन मोटिव्ह कंपनी थ्री व्हिलर ईव्हीसाठी गिगा कास्टिंग टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक करणार आहे. या करारामुळे विदर्भात औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.

‘महिंद्रा’ची १५ हजार कोटींची गुंतवणूक
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

साई ग्रुप ऑफ कंपनीजचा घटक असलेल्या सुपर स्मेल्टर्स लिमिटेडने गडचिरोली येथे दहा हजार कोटींची गुंतवणूक करत सामंजस्य करार केला. लोखंड व पोलाद उत्पादन क्षेत्रात कार्यरत असलेल्या या कंपनीचा हा औद्योगिक प्रकल्प गडचिरोलीला स्टील हब म्हणून विकसित करण्यात मोलाची भूमिका बजावणार आहे. या प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर उद्योग विभागाचे सचिव पी. अनबलगन आणि सुपर स्मेल्टर्सचे चेअरमन सीताराम अग्रवाल यांनी स्वाक्षरी केली. केवळ सात दिवसांच्या आत हा सामंजस्य करार झाला आहे. तर एन मोटिव्ह कंपनीसोबत २,५०० कोटींचा एक सामंजस्य करार विदर्भ ॲडव्हांटेजच्या पहिल्या दिवशी केवळ सात मिनिटांमध्ये झाला. थ्री व्हिलर ईव्हीसाठी उपयोगी असणाऱ्या गिगा कास्टिंग टेक्नॉलॉजीशी संबंधित हा सामंजस्य करार आहे. याशिवाय ग्लोबल इंडिया बिझनेस कॉरिडॉर (जीआयबीसी) आणि असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट (एआयडी) यांच्यात एक सामंजस्य करार झाला. जीआयबीसीचे संचालक आशुतोष देशपांडे आणि एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे यांनी स्वाक्षरी केली.

विदर्भ ॲडव्हांटेज-खासदार औद्योगिक महोत्सवाच्या पहिल्या दिवशीच महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने नागपूरकरांना आनंदाची बातमी दिली. कंपनीने अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रामध्ये १५ हजार कोटींची गुंतवणूक करत ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग युनिटची घोषणा केली आहे. तसेच यासंदर्भात राज्य सरकारसोबत सामंजस्य करार करण्यात आला. यावर राज्य सरकारद्वारे उद्योग विभागाचे सचिव पी. अनबलगन आणि महिंद्रा अँड महिंद्राद्वारे ऑटो ॲण्ड फार्म सेक्टरचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश जेजुरीकर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सामंजस्य करारामुळे नागपूरात ऑटोमोबाइल क्षेत्रातील पहिले कमर्शिअल इलेक्ट्रिक व्हेइकल युनिट सुरू होणार आहे.

२०२८ पासून उत्पादनाला सुरुवात...२