मध्य रेल्वेवर १७६ विशेष गाड्या

महाराष्ट्र टाइम्स

उन्हाळ्यातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने १७६ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनसवरून या गाड्या सुटणार आहेत. सीएसएमटी ते गोरखपूर, एलटीटी ते दानापूर, पुणे ते गोरखपूर आणि पुणे ते दानापूर या मार्गांवर या विशेष फेऱ्या धावतील. प्रवाशांनी अधिक माहितीसाठी रेल्वेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

176 special trains by central railway for summer passengers

उन्हाळ्यातील मोठी मागणी लक्षात घेता प्रवाशांची गर्दी विभागण्यासाठी मध्य रेल्वेने १७६ विशेष फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह (सीएसएमटी) लोकमान्य टिळक टर्मिनसवरून (एलटीटी) विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०१०७९/८० सीएसएमटी ते गोरखपूर (४४ फेऱ्या), (०११४३/४) एलटीटी ते दानापूर (४४ फेऱ्या), (०१४१५/६) पुणे-गोरखपूर (४४ फेऱ्या), (०१४४९/५०) पुणे-दानापूर (४४ फेऱ्या) अशा मार्गावर विशेष रेल्वे धावणार आहे. विशेष गाड्यांच्या सविस्तर माहितीसाठी आयआरसीटीसी आणि मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.