भारतीय संघास २५ कोटी

महाराष्ट्र टाइम्स

वर्ल्ड कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने विजेतेपद पटकावले. आयसीसीने भारतीय संघाला २५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. उपविजेत्या न्यूझीलंड संघाला सुमारे १३ कोटी रुपये मिळाले. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघांनाही मोठी रक्कम मिळाली. भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव केला.

india wins 25 crore prize in t20 world cup
वर्ल्ड कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाने तब्बल २५ कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दिलेल्या माहितीनुसार, या स्पर्धेसाठी एकूण १ कोटी १२ लाख ५० हजार डॉलरची बक्षिसे जाहीर करण्यात आली होती. भारतीय संघाने २६ लाख ३९ हजार ४२३ अमेरिकन डॉलर जिंकले, तर उपविजेत्या न्यूझीलंड संघाला सुमारे १३ कोटी रुपये मिळाले. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघांनी अनुक्रमे ९ कोटी २४ लाख आणि ८ कोटी ९६ लाख रुपये पटकावले. भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव केला होता.

आयसीसीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतीय संघाला विजेतेपदाचे २५ कोटी रुपये मिळाले आहेत. ही रक्कम २६ लाख ३९ हजार ४२३ अमेरिकन डॉलर इतकी आहे. गेल्या स्पर्धेच्या तुलनेत बक्षिसांच्या रकमेत लक्षणीय वाढ झाली असल्याचे आयसीसीने म्हटले आहे. उपविजेत्या न्यूझीलंड संघाला १४ लाख २२ हजार ६९२ डॉलर, म्हणजेच सुमारे १३ कोटी रुपये मिळाले. उपांत्य फेरीत हरलेल्या दक्षिण आफ्रिकेला ९ कोटी २४ लाख रुपये आणि इंग्लंडला ८ कोटी ९६ लाख रुपये मिळाले.
या स्पर्धेत वेस्ट इंडिजने ५ लाख ३८ हजार २६९ डॉलर कमावले, तर पाकिस्तानने ५ लाख २२ हजार ६९२ डॉलर जिंकले. बक्षिसांच्या यादीत झिम्बाब्वेने श्रीलंकेला मागे टाकत ४ लाख ९१ हजार ५३८ डॉलर मिळवले, तर श्रीलंकेला ३ लाख ९ हजार ८०८ डॉलर मिळाले. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेला प्रत्येकी ३ लाख ९ हजार ८०८ डॉलर मिळाले. इटली, नेदरलँड्स, संयुक्त अरब अमिराती आणि नेपाळ या संघांनी प्रत्येकी २ लाख ५६ हजार १५४ डॉलर जिंकले. कॅनडा, नामिबिया आणि ओमान या संघांना २ लाख २५ हजार डॉलरवर समाधान मानावे लागले.