‘कर्जवाढ, तरी अर्थस्थिती मजबूत’

महाराष्ट्र टाइम्स

महाराष्ट्राचे सकल उत्पन्न १८.२ टक्के असून, ते २५ टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा खूप कमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की, राज्याची आर्थिक स्थिती मजबूत आहे. महाराष्ट्र लवकरच सिंगापूर आणि यूएईला मागे टाकेल. पुढील तीन वर्षांत राज्याची अर्थव्यवस्था ९२ लाख कोटी रुपयांवर पोहोचवण्याचा निर्धार आहे. पात्र शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी घोषित केली आहे.

‘कर्जवाढ, तरी अर्थस्थिती मजबूत’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

‘आपल्या सकल उत्पन्नाच्या तुलनेत महाराष्ट्राचे कर्ज १८.२ टक्के असून, ते २५ टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा खूप कमी आहे. आपले कर्ज वाढले असले तरी कर्जाची सकल उत्पन्नाशी तुलना करता राज्याची आर्थिक स्थिती मजबूत आहे. महाराष्ट्र हे स्वतंत्र राष्ट्र असते तर जगातील अर्थव्यवस्थांमध्ये त्याचा क्रमांक ३०वा लागला असता,’ असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केला.

महाराष्ट्र आता केवळ सिंगापूर किंवा ‘यूएई’च्या स्पर्धेत नसून, लवकरच त्यांनाही मागे टाकण्याच्या तयारीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अर्थसंकल्पात पात्र शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी घोषित केली असून, या योजनेचे निकष लवकरच जाहीर केले जातील, असेही फडणवीस यांनी सांगितले.

विधानसभेत गेले दोन दिवस सुरू असलेल्या अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण वादळी चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी उत्तर दिले. राज्यातील वाढत्या कर्जावरून सरकारवर झालेल्या टीकेचा समाचार घेतला. याशिवाय पुढील तीन वर्षांत राज्याची अर्थव्यवस्था ९२ लाख कोटी रुपयांवर पोहोचवण्याचा निर्धारही फडणवीस यांनी बोलून दाखवला.

अर्थसंकल्पात भाजपकडील खात्यांना झुकते माप दिल्याचा दावा विरोधी पक्षाने केला हो, तो मुख्यमंत्र्यांनी खोडून काढला.

 संबंधित वृत्त...८