मासिआ औद्योगिक प्रदर्शनास प्रतिसाद

महाराष्ट्र टाइम्स

मासिआच्या ॲडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो २०२६ ला मोठा प्रतिसाद मिळाला. राज्यभरातील उद्योजक आले. उद्योग, स्टार्टअप्स, नवतंत्रज्ञान आणि रोजगारनिर्मितीवर परिसंवाद झाले. बीटूबी बैठकांमधून व्यावसायिक करार झाले. आंतरराष्ट्रीय मार्गदर्शकांनी निर्यात व्यवसायावर मार्गदर्शन केले. स्थानिक उद्योगांना चालना देणे हा उद्देश आहे. हे प्रदर्शन रोजगारनिर्मितीला गती देणार आहे.

masia industrial exhibition offers new path for entrepreneurs

मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज अँड ॲग्रीकल्चर (मासिआ)च्या वतीने आयोजित ॲडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो २०२६ औद्योगिक प्रदर्शनास शुक्रवारी दुसऱ्या दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला.

प्रदर्शनास भेट देण्यासाठी राज्यभरातून उद्योजकांची मोठी उपस्थिती होती.

शुक्रवारी उद्योग, स्टार्टअप्स, नवतंत्रज्ञान व रोजगारनिर्मिती या विषयांवर आधारित विविध परिसंवाद, मार्गदर्शन सत्रे व बीटूबी बैठकांना उद्योजकांनी उपस्थिती दर्शवली.

प्रदर्शनास शुक्रवारी व्हायब्रंट गुजरा, नागपूर बुरी बोटी इंडस्ट्रिअल असोसिएशन, लुधियाना, पंजाब तसेच टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू, व्हर्लपूल, टॅफे सातारा, कूपर यांसह विविध कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मार्गदर्शक जगत शहा यांचे एक्स्पोर्ट बिझनेस कसा करावा, वाढवावा या बाबत व्याख्यान झाले.

स्वप्निल गीते यांनी नवउद्योजक तसेच विद्यार्थ्यांसाठी सिक्रेट ऑफ बिझनेस या विषयावर मार्गदर्शन केले. बी टू बी बैठकांमधून व्यावसायिक करार झाल्याचे संयोजकांनी सांगितले.

मासिआ अध्यक्ष अर्जुन गायकवाड म्हणाले, की प्रदर्शनातील प्रत्येक दिवस उद्योगांसाठी नवीन संधी घेऊन येत आहे.

संयोजक अनिल पाटील, चेतन राऊत यांनी सांगितले, की मराठवाड्यातील उद्योगांना चालना देणे हा मुख्य उद्देश आहे. स्थानिक उद्योजकांना राष्ट्रीय स्तरावर पोचवणे, रोजगारनिर्मितीला गती देण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे. शनिवारी व रविवार असे दोन दिवस असून जास्तीत जास्त संख्येने भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले.