शिका ‘पब्लिक स्पीकिंग’चे तंत्र

महाराष्ट्र टाइम्स

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब आणि ज्ञानज्योती निकेतन तर्फे २० ते २२ जानेवारी दरम्यान सायंकाळी साडेसात ते रात्री साडेनऊ या वेळेत ऑनलाइन पब्लिक स्पीकिंग कार्यशाळा आयोजित केली आहे. युवा वक्ते सुजित काळंगे मार्गदर्शन करतील. या कार्यशाळेत आवाजावर संस्कार, देहबोली, सादरीकरण यावर भर दिला जाईल. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती सहभागी होऊ शकतात. करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरेल.

शिका ‘पब्लिक स्पीकिंग’चे तंत्र
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

कार्यशाळेत प्रभावी भाषण आणि संभाषणासाठी आवाजावर संस्कार, स्क्रिप्ट मेकिंग, शब्दोच्चार, देहबोली, सादरीकरण, निवेदनासाठी आवश्यक आराखडा, प्रभावी प्रेझेंटेशनची तयारी या पैलूंसह प्रसंगानुरूप भाषण कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

क्षेत्र कोणतेही असले, तरी प्रभावी संवाद आणि आत्मविश्वासपूर्ण मांडणी ही यशाची महत्त्वाची गुरुकिल्ली ठरते. अगदी आठवडी बाजारापासून ते जागतिक व्यापारपेठेपर्यंतच्या क्षेत्रात आपले विचार स्पष्टपणे आणि परिणामकारकरीत्या मांडू शकणाऱ्या व्यक्तींसाठी संधींची दारे अधिक उघडी असतात. या कौशल्याचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन ‘ऑनलाइन पब्लिक स्पीकिंग कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे.

‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’ आणि ‘ज्ञानज्योती निकेतन’ यांच्यातर्फे ही विशेष ऑनलाइन पब्लिक स्पीकिंग कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा २० ते २२ जानेवारी दरम्यान सायंकाळी साडेसात ते रात्री साडेनऊ या वेळात ऑनलाइन स्वरूपात होणार आहे. युवा वक्ते आणि अनुभवी निवेदक सुजित काळंगे या कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन करतील.

या कार्यशाळेत कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला सहभागी होता येणार आहे. विशेषतः बोलण्याशी संबंधित कोणत्याही क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे, आत्मविश्वास वाढवू पाहणारे आणि स्वतःच्या सादरीकरणात सुधारणा करू इच्छिणाऱ्यांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.

प्रभावी संभाषणासाठी आवाजावर संस्कार कसे करावेत, देहबोली कशी असावी यांसह अनेक बाबतींत मार्गदर्शन केले जाणार आहे. शंकांचे निरसन आणि प्रत्यक्ष सरावासाठीही विशेष वेळ देण्यात येणार आहे.